शुक्रवार, 2 सितंबर 2011

आदिवासी उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.458                        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा            दि.2 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------------------------------------     
     वर्धा,दि.2- केंद्रवर्ती योजने अंतर्गत, वर्धा जिल्ह्यातील, अनुसूचित जमाती (आदिवासी) साठी 2011-2012 या वर्षात पूढिल प्रमाणे संभाव्य प्रशिक्षणांच्या योजना वरिष्ठ कार्यालयाचे मंजूरीच्या अधिन राहून राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा आदिवासी उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्किक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर यांनी केले आहे.
     प्रशिक्षण योजने अंतर्गत एम.एस.सी.आय.टी.चे प्रशिक्षण,मराठी-इंग्रजी शार्टहॅन्ड प्रशिक्षण, पी.एम.टी. व सीईटी प्रशिक्षण,पदवीधर युवकांना प्रशासकीय भरती पूर्व प्रशिक्षण, कॉम्प्युटर हार्डवेअर व नेट वर्कीग प्रशिक्षण, स्पर्धा पूर्व परिक्षेत नैपूण्य होणेसाठी प्रशिक्षण, सॉफटवेअर डेव्हलपमेंट, अकांऊट टॅली, प्रेस फोटोग्राफ-वाईल्ड लाईफ व व्हिडीओ शुटींग प्रशिक्षण, डी.टी.पी. व स्क्रिन प्रिटींग,ब्युटी पार्लरचे, हलके मोटार वाहन/अवजड वाहन चालक/वाहक (कंडक्टर), गारमेंट मॅन्युफक्चरींगचे/ ड्रेस डिझायनिंग-फॅशन डिझायनिंग, मोबाईल रिपेअरिंग, इर्न्व्हटर दुरुस्ती, सि.एफ.एल.बल्ब बनविणे व दुरुस्ती, जरदोजी वर्क प्रशिक्षण, मत्स्य शेती करणा-या लोकांना मत्स्य उत्पादनाचे प्रशिक्षण, मध निर्मीतीचे प्रशिक्षण , झिंगा उत्पादन साठी प्रशिक्षण,पिव्हीसी-एचडीपीई पाईप फिटींग प्रशिक्षण व प्रमाणपत्र देणे, मत्स्य व्यवसाय करणा-या लोकांना झिंगा उत्पादन करण्याबाबतचे प्रशिक्षण, शिवणकाम प्रशिक्षण, हि-यावर पैलु पाडणे व युवक युवतींना बाबुकाम आदींचा समावेश आहे.
     पात्र आदिवासी व्यक्तींनी शासकीय आश्रम शाळा/शासकीय वसतिगृह तसेच या कार्यालयातील माहिती सुविधा केंद्रशी संपर्क साधून अर्ज करावे.
     सदर योजनांची यादीमध्ये काही नविन योजना समाविष्ठ होण्याची शक्यता आहे तसेच काही वगळण्याची शक्यता आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी असे प्रकल्प अधिकारी, एकात्किक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर कळवितात.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें